HW News Marathi
महाराष्ट्र

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

मुंबई | ठाकरे सरकारने पावसाळी आधिवेशन १४ दिवसांचं न ठेवता, केवळ ५ आणि ६ जूलै असं दोन दिवसाच ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे त्यातच आता यांच्या पाठोपाठ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

त्यांच्या पोटात दुखतं नाहीतर त्यांचं डोकं दुखतं

लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतं नाहीतर त्यांचं डोकं दुखतं. तसं काहीसं महाविकास आघाडी सरकारचं झालंय, लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्यांना अधिवेशनच नकोय, असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. राज्यात महत्वाचे विषय चर्चेसाठी असताना ठाकरे सरकारने केवळ 2 दिवस अधिवेशन ठेवल्यानं सर्व विरोधीपक्ष सरकरावर कडाडून टीका करताना पहायला मिळतायेत.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न, आशा वर्कर,परिचारिकांचे प्रश्न असे असंख्य प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर असताना २ दिवसीय अधिवेशन घेऊन सरकार काय साध्य करणार? असा सवाल करत या पळकुट्या सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचं प्रसाद लाड यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता येत्या अधिवेशनात ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठी सर्वच विरोधीपक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. मागील अधिवेशात भाजपने ठाकरे सरकारच्या दोन विकेट काढल्या होत्या. परंतू या वेळेस केवळ २ दिवस अधिवेशन असल्यानं विरोधक सभागृहाच कामकाज चालू देणार की नाही, हे येत्या ५ आणि ६ जूलैला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिवेशन केवळ दोन दिवस

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवस होणार आहे. ५ आणि ६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन पार पडेल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनाच्या प्रांगणात झाली. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील चर्चा करण्यात आली. अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘निपाह व्हायरसनं वाढवली चिंता, १२ वर्षीय मुलाचा झालं मृत्यू!’

News Desk

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे… राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – अजित पवार

News Desk

गुढीपाडव्याआधीच जनतेसाठी गुडन्यूज! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले

Aprna