HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, मनसेचा टोला

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर कुठे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. इतकंच नाही तर कोरोनावरील लसीची निर्मिती झाली असली तरी तिचाही तुटवडा जाणवत आहे. यामुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहे. या सर्व परिस्थितीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय आहे संदीप देशपांडेंचे ट्वीट?

“लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे.

 

राज्यातील कोरोनाची स्थिती काय?

राज्यात काल 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 एक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related posts

राजकारणात बदलली उपोषणाची व्याख्या

News Desk

इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा, २० ऑगस्टला पुन्हा हजर राहावे लागणार

News Desk

चंद्रपुरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याचे मुनगंटीवार यांचे आदेश

News Desk