HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२१ मे) तौत्के चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. काल ते कोकण दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका केली जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी खोचक टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नितेश राणेंची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून १० किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना?

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.

कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा दणका, आयुक्तांकडून स्थायी समितीतील ६५० कोटींचा फेरफार रद्द

Aprna

वाशिम जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसल्यास बॅड मार्निंग होईल  

News Desk

भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, 186 मच्छिमारांना वाचवलं, नौदल प्रमुखांनी घेतली दखल

News Desk