HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, मनसेने उडवली खिल्ली

नाशिक | नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं असं म्हटलं. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसेनेही आता यावर आपलं मौन सोडलं आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे असं म्हणाले आहेत की, “उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात. पण राऊत काहीही बोलतात. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार?” अशी खिल्ली मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उडवली. ते नाशिकमध्ये बोलत होते. मनसे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याची घोषणा संदीप देशपांडे यांनी केली आहे.

कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी खिल्ली उडवली. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसापूर्वी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावं लागलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी निशाणा साधला आहे. सध्या संदीप देशपांडे हे अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आहेत.

अमित ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दिवसभरात अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना उभारलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये बोटॅनिकल गार्डनचा समावेश होता. याशिवाय, अमित ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारकालाही भेट देणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री!

News Desk

राज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती

Aprna

या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आहे, राणेंची मुख्यमंत्र्यावर जहरी टीका  

News Desk