HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीमधील सहकारी बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली

सांगली | सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव केला आहे. सांगली शहरातील विजयनगर भागतील सहकारी बँकेत काम करणाऱ्या ४७ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ही आल्याची माहिती आज (१९ एप्रिल) मिळाली आहे. १५ एप्रिलला तब्येत खराब झाल्याने त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, १७ एप्रिलला जास्त तब्येत खराब झाल्याने आणि कोरोनाचा संशय आल्याने मिरज मधील कोरोना रुग्णालयात त्याला ऍडमिट करून स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यामुळे सांगलीत आता कोरोना रुग्णांची संख्या २७ वर गेल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आणि नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. यामुळे सांगलीतील लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. बँक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ही आढळून आल्याने बँकेत येऊन गेलेल्याची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसाकडून सुरू, ज्या रुग्णालयामध्ये ही व्यक्ती सुरुवातीला ऍडमिट होती त्या रुग्णालय डॉक्टर , कर्मचारी याना क्वारनटाइनच्या सूचना दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी परिषदेसाठी काँग्रेसचे नाना पटोले जाणार पवारांच्या बारामतीत!

News Desk

लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यात माझ्याकडून चूक झाली !

News Desk

पंतप्रधानांनी सांगूनही भाजप पुढार्‍यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचं आश्चर्य!

News Desk