HW News Marathi
महाराष्ट्र

संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती, तर अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

मुंबई। संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. अयोज महेता यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास पद दिले आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.

विद्यमान मुख्य सचिव असलेले अजोय मेहता हे ३०जून रोजी निवृत्त होत आहेत. मे २०१९ मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. अजोय मेहता यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या नावाची चर्चा झाली होती. परंतु, संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळाली.

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे १९८४ च्या बॅच चे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील! – अनिल परब

Aprna

“कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही,” सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले

Aprna

नाव राष्ट्रवादी असून पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणविसांचा शरद पवारांना टोला

News Desk