HW News Marathi
Covid-19

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह 

मुंबई | कोरोनाचा प्रसार राज्याच्या मंत्रीमंडळात वेगाने होताना दिसत आहे. आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुख्य सचिव घरीच क्वारंटाईन आहेत. गेल्या काही दिवसांत मुख्य सचिव हे अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची सध्या चिंता आणखी वाढली आहे.

२२ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. २ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनावर सौम्य लक्षण जाणवत असल्याने स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वतः विलगीकरणात गेले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तरी जागे व्हा ! फडणवीसांचा आघाडी सरकारला सल्ला 

News Desk

ठाकरे-पवार यांच्या भेटीनंतर आघाडीतील नाराजी दूर होणार?

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चार धाम यात्रा स्थगित, उत्तराखंड सरकारचा निर्णय

News Desk