HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा म्हणजे कॉंग्रेसला संपवण्याचा कट” – संजय निरुपम 

मुंबई | काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात सुरु झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने आणि स्वत: शरद पवार यांनी या संदर्भात खुलासा केला असला तरी यावरून तर्कवितर्क सुरूच आहेत. काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हे राहूल गांधींच्या विरोधातील षडयंत्र आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे”, असे वक्तव्य संजय निरुपम यांनी केले आहे. यावर आता राजकीय वर्तृळातून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक सुरु, फडणवीसांचा दावा

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता कोणती मोठी घोषणा करणार ?जनतेशी साधणार संवाद

News Desk

आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, शिवसेना आक्रमक 

News Desk