HW News Marathi
महाराष्ट्र

संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती

मुंबई | वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांच्या जागी आता महाराष्ट्र माजी महासंचालक संजय पांडे यांची नियुक्त करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांची आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर संजय पांडे यांच्याकडे आता मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या संजय पांडे हे चंदीगढमध्ये आहेत. 

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार हा हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. याआधी संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची तात्पुरती जबाबदारी दिली होती. पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पांडे यांना एप्रिल २०२१ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांसह ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची नार्को टेस्ट करावी, आशिष शेलारांची मागणी

News Desk

ग्रामपंचायतींना मिळणार ५० लाखांचे बक्षीस, विभागातही कोविडमुक्त गाव अभियान राबवणार : अजित पवार

News Desk

राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता!

News Desk