HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेते संजय राठोड पोहरादेवीला रवाना

यवतमाळ | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनाऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. त्यांच्यासोबत यवतमाळचे शिवसेना नेतेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपने संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते.

या प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल होते. ते यवतमाळ येथील त्यांच्या घरीही नव्हते. राठोड यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राठोड यांनी आज या नेत्यांशी बराचवेळ चर्चा केली. त्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले आहेत. दरम्यान, संजय राठोड यांच्या स्वागतासाठी अनेक लोकांनी, कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी गर्दी केली आहे.

संजय राठोड यांच्यासोबत २० वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहन, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे. राठोड हे यवतमाळ येथून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहे. हे अंतर यवतमाळ यांच्या घरापासून ८० किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांना दीड ते दोन तास पोहरादेवीत पोहोचायला लागणार आहेत. राठोड हे ८० किलोमीटर प्रवास करून जात असून अनेक त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच, पोहरादेवी मंदिरात राठोड यांच्यासाठी होमहवन सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय- अजित पवार

News Desk

पवारांच्या बारामतीत होणाऱ्या ‘एल्गार महामोर्चाला’, पोलिसांनी नाकारली परवानगी…!

News Desk

अखेर मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

News Desk