HW News Marathi
महाराष्ट्र

वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल, थोड्याच वेळात पोहरादेवीसाठी रवाना होणार

यवतमाळ | पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तृळात गोंधळ निर्माण झाला होता. त्याचे कारण म्हणजे या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर अनेक दिवस नॉट रिचेबल असणारे संजय राठोड आज (२३ फेब्रुवारी) लोकांसमोर येणार आहेत. यवतमाळ येथील त्यांच्या राहत्या घरी ते दाखल झाले असून थोड्याच वेळात ते पोहरादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. दरम्यान, या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच,संजय राठोड यांच्या घरी शिवसेनेचे नेते येण्यास सुरुवात झाली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड ,माजी आमदार विश्वास नांदेकर दाखल, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंतीवार, संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक राठोड यांच्या घरी दाखल झाले आहेत. संजय राठोड यांचे मेहुणे सचिन नाईक यांनी संजय राठोड काही वेळात निघणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, पोहरादेवी मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोहरादेवी मंदिर परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. बॅरिगेट लावून पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले आहेत. संजय राठोड यांच्या दौऱ्यावर ड्रोनच्या साहायाने पोलीस नजर ठेवणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संत गाडगेबाबांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

News Desk

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येणार?

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk