HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन विरोधकांनी घाणेरडं राजकारण केलं – संजय राठोड

यवतमाळ | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन आरोप करण्यात आला. दरम्यान, पूजाच्या आत्महत्येनंतर काही दिवस राठोड कुटुंबीयांसोबत अज्ञात वासात होते. त्यानंतर आज ते पोहरादेवीत देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सामील आहोत असंही राठोड यांनी म्हटले आहे.

तसेच,” माझ्यावर केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन विरोधकांनी घाणेरडं राजकारण केले आहे. माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा हा प्रयत्न आहे. गेले काही दिवस मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करत होतो. या प्रकरणावरुन माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचे थांबवा”, असे आवाहनही राठोड यांनी केले आहे.

तर, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्या चौकशीअंती सगळं समोर येईल”. तसेच, पूजा चव्हाणसोबत जे फोटो वायरल होत आहेत त्यावरही राठोड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी ४ वेळा निवडून आलो आहे. माझ्यासोबत अनेकजण फोटो काढतात”, असे स्पष्टीकरण संजय राठोड यांनी पूजा सोबतच्या फोटोवरुन म्हटले आहे.

Related posts

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २१६० कोटींची मदत

News Desk

रक्ताच्या बाटल्या फोडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

News Desk

…तर मग तुम्ही हेडगेवार, गोळवलकर, नथुराम गोडसेच्या नावाने मतं मागून दाखवा !

News Desk