HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी ! पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी दिला मुख्यमंत्र्यांकडे अखेर राजीनामा

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.

अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे, टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या. यात शिवसेनेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं, मातोश्रीवर आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिराचा वाद पेटला, भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा, प्रत्युत्तरासाठी शिवसैनिकही एकवटले

News Desk

रामदास कदमांचे प्रभादेवी परिसरातील दुकानांवर छापे

Gauri Tilekar

… लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

Aprna