HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’, राऊतांचं सूचक विधान

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षएकत्र येऊन काम करत आहेत. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या विषयावर मतभेद असू शकतात पण सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज आहेत अशा चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचे व्यवस्थित सुरू आहे’ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच, पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी या केलेल्या वक्तव्यानंतर चर्चांना सुरुवात झाली आहे. इतकचं नाही तर शरद पवार यांच्या भेटीबद्दल देखील त्यांनी खुलासा केला आहे.

मोदी उध्दव ठाकरेंसाठी अजूनही नरेंद्रभाईचं

‘अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट झाल्याची चर्चा रंगली होती. पण कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवारांनी केला आहे. पंतप्रधान मोदी- उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढायची गरज नाही. या दोन्ही बैठकांमागे काहीही राजकारण नाही. आजही मोदी हे ठाकरेंसाठी नरेंद्रभाई आहे’, असं विधानही राऊत यांनी केलं.

सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत!

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही. सर्वकाही व्यवस्थित आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पण केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. तीन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे थोडे फार मतभेद होतीलच. पण, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात. पण नाराज कुणीच नाही, विरोधी पक्षाला हवे असलेले घडत नाही, त्यामुळे अफवा पसरवल्या जात आहे, असंही राऊत म्हणाले.

फडणवीसांची संन्यासाची भाषा म्हणजे वैफल्य

‘अनिल देशमुख, प्रताप सरनाईकांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांची कोंडी केली जात आहे. भाजपमध्ये धुतल्या तांदळाचे आहेत का? हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ? तिन्ही पक्ष यावर एकत्र बसून पुढील वाटचाल ठरवली जाईल, असंही राऊत म्हणाले. पुढे ते असं देखील म्हणाले की, ‘विरोधी पक्षाची भूमिका दिसत नाही. फडणवीस संन्यास घेण्याची भाषा करतात हे त्यांच्या पक्षाचे वैफल्य आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रक्षाबंधनाला शौचालयाची भेट

News Desk

पेड्रोल-डिझेल किंमतीवरून पंतप्रधानांनी खडेबोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली तीव्र प्रतिक्रिया

Aprna

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna