HW News Marathi
महाराष्ट्र

मी आणि फडणवीस यापुढेही भेटत राहणार!

मी शरद पवारांना भेटत होतो तेव्हाही चर्चा व्हायची…फडणवीसांच्या भेटीनंतर राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमूळे राजकारणात खळबळ उडाली. अर्थात ही भेट का झाली याचे उत्तर दोन्ही नेत्यांची दिले आहेच. यावर आणखी सविस्तर उत्तर संजय राऊत यांनी आज (२९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिले आहे. “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचं नावलौकिक होत आहे. तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे असं सांगताना संजय राऊत यांनी सामनातील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली,” असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. याआधी शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अनएडिटेड असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

“जेव्हा दोन शास्त्रज्ञ भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रात काय सुरु आहे यावर चर्चा करतात. जेव्हा दोन राजकारणी भेटतात तेव्हा ते राजकीय क्षेत्रावर बोलतात. आम्ही भेटत नाही असं वाटत असेल तर त्याला काही पर्याय नाही. पण असे भूकंप वैगेरै काही होत नाहीत,” असं संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर बोलताना सांगितलं. आमच्या भेटीवर कोणी नाराज असेल असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी गेल्या वर्षी भेटत होतो. त्यामुळेही काही जण नाराज होते. मात्र त्यातूनच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं,’ असं राऊत म्हणाले. विरोधी पक्षांमधील नेत्यांना भेटायचं नाही असा कायदा आहे का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारू पिऊन नाचणारे 12 इंजिनियर निलंबित: विडीओ वायरल

News Desk

कोरोना प्रतिबंधक साधनांचा पुरवठा बंद होणार यावर रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

News Desk

ठाकरे घराणं पुन्हा आमने सामने, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल

News Desk