HW News Marathi
देश / विदेश

‘कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच’, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

नगर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेवरून राजकारणात आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना लगावला आहे.

शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि आता त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे. संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असंही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असं ते म्हणाले आहेत.

मोदी म्हणतात कैसे हो भाई?

नारायण राणेंना आता केंद्रीय मंत्रिपद मिळालं असून संजय राऊतांनी आता त्यांच्या वर टीका केली आहे. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असं सांगितलं. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

नारायण राणेंचं तोंड बंद शिवसैनिक करू शकतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीके वरून आता शिवसैनिक नारायण राणेंवर चांगलेच भडकले आहेत. नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी नारायण राणेंना इशाराच दिलाय.

काय म्हणाले नारायण राणे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ जुलैला चिपळुणमधल्या पुराचा आढावा घेतला होता. त्यावेळी, ‘सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही. मला कुणीही सीईओ वगैरे भेटलेला नाही, मी बाजारपेठेतच उभा आहे, कुठे आहेत सीईओ दाखवा’ असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रोकडून ‘आरआयसॅट-२ बी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने नद्यांना आला प्रचंड मोठा पूर, भीषण जलप्रलयात १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती

News Desk

गुगलनेही सर्व कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होमचे दिले आदेश

swarit