मुंबई | आज (१ जुलै ) पंढरपुरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली, राज्यावरील कोरोनाचं संकट दूर होऊदे ही प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला केली. कोरोनाकाळात संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरला नेण्यात आल्या यावर भाजप आमदाराने टिका केली. भाजप नेते अवधूत वाघ यांनी आमदारांना मर्सिडीज आणि माऊलींच्या पादुकांसाठी लाल डब्बा असं म्हणत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला होता.
याच टोल्याला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जशी पंढरीची विठुमाऊली महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या हृदयात आहे तशीच लाल परी अर्थात एस.टी.सुद्धा या भाविकांच्या मनात आहे. आज या एस.टी.तून संतांच्या पालखीसोबत भाविक मनाने पंढरपूरला नक्की पोहोचले आहेत, कारण एस.टी. सोबत राज्यातील जनतेचं भावनिक नातं आहे, असे म्हणत त्यांनी अवधूत वाघ यांना एस. टी चे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली. अशावेळी आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तिर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूर मध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती.
जशी पंढरीची विठुमाऊली महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या हृदयात आहे तशीच लाल परी अर्थात एस.टी.सुद्धा या भाविकांच्या मनात आहे. आज या एस.टी.तून संतांच्या पालखीसोबत भाविक मनाने पंढरपूरला नक्की पोहोचले आहेत, कारण एस.टी. सोबत राज्यातील जनतेचं भावनिक नातं आहे. https://t.co/gr4i5eJZju
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.