HW News Marathi
महाराष्ट्र

सतेज पाटील गटाचे ३ शिलेदार विजयी ,महाडिक गटाची धारधूक वाढली !

कोल्हापूर | संपुर्ण महाराष्ट्रात लक्ष लागून राहिलेल्या गोकुळचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जवळजवळ २५०० कोटींची उलाढाल असणाऱ्या गोकुळची निवडणुक यंदा अधिक चर्चेत आहे कारण महाविकासआघाडीचे आमदार,खासदार एकत्रितपणे कामाला लागले आहेत.

सतेज पाटील विरूद्ध महादेव महाडिक असा सामना असताना गोकुळ दूधसंघ कोणाच्यातरी हातात जाणार याचा निकाल आज लागणार आहे.मतमोजणीला सुरूवात झाली आहे आणि पहिले काही निकाल हाती आले आहेत.माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि अमर पाटील यांनी बाजी मारली आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गातील बयाजी शेळके हे सुद्धा विजयी झाले आहेत. आतापर्यंत सतेज पाटील गटाचे तीन उमेदवार विजयी

सतेज पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी

सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी

अमर पाटील – 436 मतांनी विजयी

बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या मोर्च्याचा असा आहे मार्ग

swarit

“बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला!” – शरद पवार

News Desk

शरद पवारांचे निकटवर्तीय अॅड एकनाथराव साळवे यांचं निधन

News Desk