HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सत्यजित तांबेनी केला निषेध

मुंबई | गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी टीका केली आहे. “एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? गेले अनेक महिने मुलांनी जी तयारी केली आहे त्या विद्यार्थअयांना अडचणीत टाकणारा हा निर्णय आहे. ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे. मुलं आज बेरोजगारीने बेजार असताना अनेक दिवस आपल्या गावापासून, घरापासून दूर राहून MPSC, UPSC चा अभ्यास केला आहे. आणि या निर्णयाचा जाहीर निषेध करतो,” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत पण…’गृहमंत्र्यांचे त्या चौकशीवर स्पष्टीकरण

News Desk

अखेर परमबीर सिंह मुंबईत दाखल!; म्हणाले, “मी…”

News Desk

‘महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, सत्तेची लालसा अजूनही दिसून येते’

News Desk