HW News Marathi
महाराष्ट्र

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी सुरू असल्याचे काही घटनांमधून समोर येत होतेच. त्यातच आज (१६ जुलै) महाजाॅब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टिका केली होती मात्र त्यामुळे राज्यात महाविकासआघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर आले. त्यानंतर तांबेंनी पुन्हा ट्विट केले आहे. ते म्हणतात ,’सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।’

 

आधी काय केले होते ट्विट-

महाजाॅब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.

 

महाजाॅब्स पोर्टलच्या या जाहिरातीवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत काहीतरी बिघाड असल्याचे समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनातून भाजपवर टीका

News Desk

कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही! – हसन मुश्रीफ

Aprna

घरी जाण्यासाठी पायी प्रवास करणे जीवावर बेतले, ७ प्रवाशांचा अपघात

swarit