मुंबई | दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे फटाक्यांची आतीषबाजी होणार. मात्र, प्लॅस्टिकप्रमाणे मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवरकायमस्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, कृपया मोठे आवाज करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पद्धतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देतील” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने परिपत्रक जारी करुन नागरिकांना दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरण मंत्री मा. आदित्यजी ठाकरे @AUThackeray यांना विनंती, कृपया मोठे आवाज़ करणाऱ्या व धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पध्दतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील. https://t.co/Hv69sU3WAc
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) November 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.