HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#CoronaVirus : राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

मुंबई | सरकारी यंत्रणा योग्य दिशने काम करत आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले  आहे. एकप्रकारे हे कोरोनाशी युद्ध आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल (२२ मार्च) फोनवर बोलणे झाले असल्याचेही राज ठाकरे सांगितले. राज ठाकरे यांनी आज (२३ मार्च) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील जनतेला गर्दी टाळा, घरात राहा, असे आवाहन त्यांनी केले, राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत जमाव बंदी लावली असली, तरी लोक घरातून बाहेर पडसे तर लोकोनाचे संकट वाढले, ही जमाव बंदी पुढे सुरू राहू शकते, असे संकेत राज ठाकरेंनी यावेळी दिला.

लवकरात लवकर संकट टळो, सरकारी कर्मचारी,  डॉक्टर, पोलीस, केंद्र-राज्य सरकारनचे हे सर्वजण कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी काम करत, त्या सर्वांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन केले. काही मुठभर लोकांना अद्याप काही गंभीर्य कळाले नाही, जनता कर्फ्यू म्हणजे ही एक टेस्ट होती, असेही राज ठाकरे म्हणाले. एकप्रकारे ही कोरोनाशी युद्ध आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल (२२ मार्च) फोनवर बोलणे झाले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. ज्या लोकांनी आजपर्यंत डॉक्टरांवर हात उचलेले त्यांना आता त्यांचे महत्त्व कळाले.

हतातावर पोट चालणाऱ्यांनी थोड्या कळा सोसाव्या लागतील. हातातवर पोट भरणाऱ्यांना लोकांनी मदत करावी, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. सरकारी यंत्रणा योग्य दिशने काम करत आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे यांचे कौतुक केले  आहे.

राज ठाकरेंचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  •  राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक
  • मी काल उद्धव ठाकरेंशी बोललो
  •  आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलीये की डाॅमेस्टिक विमानसेवा बंद करावी
  •  ज्यांनी आजवर डाॅक्टरांवर हात उचलला आहे त्यांना आता डाॅक्टरांचं महत्व कळालं असेलं
  • कालचा जनता कर्फ्यु ही टेस्ट केस होती,पण लोक गंभीर नाहीयेत त्यामुळे सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील
  • जर लोकांना सांगितलय एकत्र येऊ नका , तर काल ५ वाजता लोक एकत्र का जमले
  • हात धुवा हे सांगणार नाही ,कारण कोरोना हात धुवून मागे लागला आहे
  •  ३१मार्चपर्यंत बंद असला तरी ही तारीख पुढे जाणार आहे
  •  कोणालाचं घरी बसायला आवडत नाही,पण सरकारलाही माहिती नाही हा रोग किती पसरणार आहे
  •  हात जोडून विनंती करतो काही दिवस घरात बसा

Related posts

मुख्यमंत्र्यांची इंडियन ब्रॉडकास्टर्ससोबत बैठक, सावधानता बाळगून निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार

News Desk

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

News Desk

अंगणवाडी कर्मचारी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम

News Desk