मुंबई | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २३ मेला होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे. यापूर्वी २५ एप्रिलला होणारी परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळे २३ मेला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ५वी आणि ८वीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली आहे. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शालेय शिक्षण विभागानं २३ मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Given the prevailing Corona virus pandemic, Maharashtra State Council of Examination's Pre-Upper Primary Scholarship (Class V) & Pre-Secondary Scholarship (Class VIII) examinations scheduled to be held on May 23, 2021 have been postponed till further notice. pic.twitter.com/RSS4GtZGFG
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 10, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.