HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिस भरती प्रक्रियेत SEBCचे आरक्षण ठेवणार नाही

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ सुरू आहे. अशात राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. १५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

News Desk

भाजपने उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य शोधलं! 5 पोलिस ठाण्यात तक्रार करणार

News Desk

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल

Aprna