नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच.डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांच्याविरोधात कुमारसैन (हिमाचल प्रदेश) येथे दुसरी FIR दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे दुआ यांच्याविरोधात 124 A-Sedition, 268, 501 & 505 या कलमांतर्गत ही दुसरी FIR दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी, दिल्ली भाजप प्रवक्ते नवीन कुमार यांनी विनोद दुआ यांच्याविरूद्ध 4 जूनला पहिली FIR दाखल केली होती. एच.डब्ल्यू. हिंदीसाठी ‘द विनोद दुआ शो’ या त्यांच्या शोमधल्या काही एपिसोडचा दाखला देत, ही पहिली FIR दाखल करण्यात आली होती. विशेषतः दिल्ली दंगल, ज्योतिरादित्य सिंधियांच्या भाजप प्रवेश, व्यापम घोटाळा प्रकरणाशी संबंधित एपिसोडमुळे ही पहिली FIR दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात दिल्ली साकेत न्यायालयाने विनोद दुआ यांना २९ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. त्यानंतर, आता दुआ यांच्या विरोधात आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.
Second FIR registered against @VinodDua7 in Kumarsain Police Station, Shimla, Himachal Pradesh. This time U/S124 A- Sedition, 268, 501 & 505.
— Sujit Nair (@sujitnair90) June 11, 2020
संबंधित बातम्या :
सरकारला प्रश्न विचारल्यामूळे विनोद दुआ यांच्याविरूद्ध भाजप प्रवक्त्याकडून FIR दाखल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.