HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानतून धमकीचा फोन

मुंबई | पाकिस्तानच्या कराचीमधल्या शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला. यानंतर आता देशाची आर्थिक राजनाधी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलमध्ये काल (२९ जून) बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणाची माहिती ताज हॉटेल व्यवस्थापनाने मुंबई पोलिसांनी माहिती दिली आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबईनंतर पोलिसांनी रात्रभर हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली. हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबई आणि किनारपट्टीवरील गस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. जवळपास ६० तास सुरक्षा यंत्रणांचे ऑपरेशन सुरू होते. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. दहशतवादी अजमल कसाबची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यातून पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. २१ सप्टेंबर २०१२ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली.

 

 

 

 

Related posts

गणेशोत्सवाचं भक्तांचा उत्साह शिगेला

News Desk

माई आंबेडकर सभागृहाचे रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन

News Desk

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Kiran Yadav