मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात अकडकलेल्या स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी मदत केल्याबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट करत अभिनेता सोनू सूदचे कौतुक केले आहे. सोनू सूद यांनी स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करून त्यांच्या घरी पाठवले आहे.
I’ve had the privilege of knowing you as a professional colleague for over 2 decades now @SonuSood & celebrated your rise as an actor ;but the kindness you have displayed in these challenging times makes me prouder still 🙏thank you for helping those in need🙏🙏 https://t.co/JcpoZRIr8M
— Smriti Z Irani (@smritiirani) May 24, 2020
स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याचा सर्व खर्च हा खर्च सोनू सूदने उचलला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोन सूदने केले एक ट्वीट रिट्वीट करत म्हणाले, “एक सहकारी म्हणून जवळपास दोन दशकांपासून तुला ओळखण्याचं भाग्य मला लाभले आहे. तुला एक अभिनेता म्हणून मोठे होताना पाहिले आहे. पण या कठीण काळात तू दाखवलेल्या माणुसकीमुळे तो अभिमान कायम ठेवला आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल आभार, असे म्हणाल्या आहेत. सोन सूनने म्हणाले, मित्रांनो पायी का?, चाला नंंबर पाठवा, हे ट्वीट स्मृती इराणींनी रिट्वीट केले.
यही सब याद रहता हैं दुनिया मैं 🙏
— Ravi Kishan (@ravikishann) May 24, 2020
स्मृती इराणींनी पाठोपाठ अभिनेता आणि भाजपा नेते रवी किशन यांनीदेखील उत्तर देत सोनू सूदचे कौतुक केले आहे. “हेच सर्व तर जगात लक्षात राहते,” असे त्यांनी म्हटले आहे. सोनू सूद महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसेसची सोय करत असून आतापर्यंत त्याने कर्नाटकमधील गुलबर्गा आणि उत्तर प्रदेशसाठी पाठवल्या आहेत. यासाठी सोनू सूदने महाराष्ट्रासहीत दोन्ही राज्यांकडून परवानगी घेतली होती. सोनू सूदला प्रत्येक बसमागे जवळपास ६० हजार ते दोन लाखांचा खर्च येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.