HW News Marathi
महाराष्ट्र

मला जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे !

जळगाव | “गेल्या काही दिवसात माझ्यावर अन्याय होत आहे. मला टार्गेट केले जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शेवटी मी माणूस आहे, देव नाही, मलाही भावना आहेत,” अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. जर माझ्यावर असाच अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी पक्षला दिला आहे. “मी गेल्या अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठेने काम करत आहे. परंतु, “आता मला जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे. मी काहीही केलेले नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले आहे,” असे दुख देखील खडसेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

“मी पक्ष सोडणार नाही,” असे खडसेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मात्र, जळगावमध्ये आज (७ डिसेंबर) जिल्ह्याची मिटींग होती. “उत्तर महाराष्ट्राची मिटींग होती. तर मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीसाठी बोलवले. मला निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले आहे. मला आता कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. अशा प्रत्येक ठिकाणी अन्यायाने वागणूक होत, असेल जाणीवपूर्वक मला दूर ठेवत असतील तर मी काय करावे,” असे अनेक सवाल खडसेंनी राज्यातील भाजप नेत्यांना बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.

खडसे- पाटीलांमधील बंद दाराआड चर्चेत नेमके काय झाले

“मी ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला असे कधीही बोललो नाही. मी बहुजन समाज आणि ओबीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अन्याय होतो आहे.” अशी त्यांच्यात भावना असल्याचे खडसे म्हणाले. त्यांच्याविरोधात अन्याय होतो असे त्यांना वाटते. या बैठकीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खडसेंची बंद दाराआड चर्चा झाली. यावर खडसेंना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, “मी मुक्ताईनगरमधील निवडणुकीबद्दल पाटलांसोबत चर्चा केली. त्यात रोहिणी खडसेंच्या मतदारसंघात पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आणि त्यांचा पराभव फक्त १८०० मतांनी झाला. याबाबत मी सर्व पुरावे प्रदेशाध्याक्षांना दिले. या पुराव्यात फेसबुक पोस्ट, ऑडियो क्लिप, एकमेकांचे झालेले संभाषण जे पक्षविरोधी होते. त्यावेळी मी त्यांना हे पुरावे माध्यमांना दाखवण्याची परवानगी द्यावी. असे त्यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. हा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. जर तुम्ही असे केलात, तर पक्ष शिस्तीचा भंग होऊ शकतो.” असे मला पाटील यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम मुझे कब तक रोकोगे?” -पंकजा मुंडे

News Desk

“बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”अमोल मिटकरींची भाजपच्या आंदोलनावर टिका

News Desk

कर्जमाफीसाठी वंचित शेतक-यांनो अर्ज करा – सुभाष देशमुख

News Desk