HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली, तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन!

जळगाव | “पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन,” असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीआधी माध्यमांशी बोलत ते म्हणाले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडले, असा आरोप खडसेंनी काही दिवसांपूर्वी पक्षावर केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपाचे खंडन करत म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते, असे उत्तर दिले होते. तसेच “भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर कराच, असे खुले चॅलेंज महाजनांनी खडसेंना दिले होते. त्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कोणी काम केले, याचे विश्‍लेषणवजा माहिती व तक्रारीही खडसेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहेत. पार्श्वभूमीवर आज (७ डिसेंबर) भाजपने त्यांच्या विभागीय कोअर कमिटीची बैठक जळगावात बोलविली आहे. मुख्यते ही बैठक खडसेंची मनधरणी करण्यासाठी बोलविण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळ रंगल्या आहेत. परंतु, खडसे या बैठकीला येणार का? हा सवाल देखील उपस्थित झाला होता. कारण गेल्या काही दिवसांपासून खडसे हे पक्षावर आरोप करत आहे. खडसे हे बैठकीला येणार नाही, असे अनुमान राजकीय विश्लेषकांनी काढण्यास सुरुवात केले होती. मात्र, या सर्वांचे अनुमान खोटे ठरवित खडसे हे कन्या रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्यासह आज दुपारी साडेतीन वाजता भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित झाले.

खडसे नमके काय म्हटले

बैठकीला खडसेंच्या उशीरा ऐन्यावर प्रश्न विचारल्यावर त्यांनी माध्यमांना उत्तर दिले की, मला साडेतीनच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मी निमंत्रणानुसार साडेतीनच्या बैठकीला हजर झालो आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “पुरावे वगैरे आता प्रश्‍नच नाही. मी अस्वस्थ अथवा नाराजही नाही. महाजानांनी सांगितले होते की, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते बाहेर, जनतेसमोर मांडा. माझ्याकडे नावानिशी सर्व पुरावे आहेत. परंतु, ही माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. अशी आमच्या पक्षाची शिस्त आहे,” असेही खडसे म्हणाले. “या बैठकीत अध्यक्षांनी मला पुरावे जाहीर करण्याची परवानगी दिली तर बैठकीनंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन मी सर्व पुरावे तुमच्यापुढे ठेवेन,” असे खडसे माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले. प्रदेशाध्यक्षांना मी हे सगळे पुरावे आधीच दिलेले आहेत, असेही खडसे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष? कोणाच्या  नावाची लागणार वर्णी

News Desk

‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही’ – छगन भुजबळ

News Desk

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk