HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षात अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल !

मुंबई | “काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय, पक्षात अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला दिला आहे. खडसे पुढे म्हणाले की, पक्षवाढीसाठी ओबीसी नेत्यांचा मोठा वाटा झाल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी म्हटले. उत्तर महाराष्ट्रस्तरीय ५ जिल्ह्यांची भाजपच्या विभागनिहाय कोअर कमिटीच्या आज (७ डिसेंबर) बैठकी बोलविण्यात आली होती. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खडसे या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

या बैठकीनंतर खडसेंनी पत्रकार परिषद आयोजित म्हणाले की, “पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडले असून यासंदर्भातील मी प्रदेशाध्यक्षांना सर्व पुरावे दिले असून पक्षाविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.” मी कधीच म्हटले नाही की, पक्षात ओबीसी नेत्यांना डावले जातेय, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.

खडसे हे बैठकीला येणार नाही, असे अनुमान राजकीय विश्लेषकांनी काढण्यास सुरुवात केले होती. मात्र, या सर्वांचे अनुमान खोटे ठरवित खडसे हे कन्या रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्यासह आज दुपारी साडेतीन वाजता भाजपच्या विभागीय कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित झाले. खडसेंना बैठकील उशीरा ऐन्यामागचे कारण विचारल्यावर त्यांनी माध्यमांना उत्तर दिले की, मला साडेतीनच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मी निमंत्रणानुसार साडेतीनच्या बैठकीला हजर झालो आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय”, रायगडावर केलेल्या लायटिंगवरुन उपमुख्यमंत्र्यांचीही नाराजी

News Desk

“अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला वाचवा…” विनायक राऊतांवर नितेश राणेंचा निशाणा

News Desk

मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण

swarit