मुंबई। ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांच आज गुरूवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रणपिसे यांच्या हर्नियाच्या ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आ. शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शरदराव रणपिसे यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक नेतृत्व गमाविल्याची भावना काँग्रेस पक्षातून व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे! pic.twitter.com/y0iycbNqCB
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 23, 2021
कोण होते शरद रणपिसे?
शरद रणपिसे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. महाविद्यालयीन शिक्षण देखील त्यांनी पुण्यनगरीतच घेतलं. पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांना राजकारणाचं वेड लागलं. पुढे काही काळातच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.बी कॉम पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालं होतं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा त्यांना अवगत होत्या. विधिमंडळात अभ्यासू आणि संयमी भाषण करण्यात ते तरबेज होते. विविध विषयांवर काँग्रेसची बाजू ते मांडायचे. विधिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची. महानगरपालिकेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.