HW News Marathi
महाराष्ट्र

‘माझ्या प्रिय मुंबईकरांनो…’ मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर संजय पांडेंची भावनिक पोस्ट

मुंबई | वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. संजय पांडे यांनी काल (२ मार्च) मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. ‘तुमचा पोलीस आयुक्त होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे,’ अशी फेसबुक पोस्ट लिहून संजय पांडे यांनी मुंबईकरांना भावनिक साद घातली आहे. संजय पांडे म्हणाले, “मी गेली ३० वर्षे मुंबईत घालवली आहेत. आणि मुंबई पोलिसात विविध पदांवर काम केले आहे. काहींना माझ्या १९९२-९३  मधील धारावीच्या दिवसांपासून तर काहींना मी १९९६-१९९७  मध्ये आर्थिक गुन्ह्यांचे नेतृत्व केले तेव्हाचे दिवस आठवतील,” असे ते म्हणाले. 

संजय पांडे यांची २८ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांच्या जागी आता महाराष्ट्र माजी महासंचालक संजय पांडे यांची नियुक्त करण्यात आली आहे. संजय पांडे यांनी कानपूर आयआयटीमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. ते १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पांडेंनी १९९८ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून पुढील पदव्युोत्तर शिक्षण घेतले आहे.

संजय पांडेंचा फेसबुक पोस्टवरील मुंबईकरांना संदेश 

माझ्या प्रिय मुंबईकरांनो,

तुमचा पोलीस आयुक्त होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. आणि मी तुम्हाला ही पहिली पोस्ट अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीच्या भावनेने लिहित आहे. मी काल मुंबई आयुक्तचा पदभार स्वीकारला आहे. मी गेली ३० वर्षे मुंबईत घालवली आहेत. आणि मुंबई पोलिसात विविध पदांवर काम केले आहे. काहींना माझ्या १९९२-९३  मधील धारावीच्या दिवसांपासून तर काहींना मी १९९६-१९९७  मध्ये आर्थिक गुन्ह्यांचे नेतृत्व केले तेव्हाचे दिवस आठवतील.

माझी मुंबईशी ओळख असली तरी, ज्या दिवसांपासून मी मुंबईत काम केले त्या दिवसांपासून पोलिसांची काम करण्याची पद्धत बदलली आहे. आणि हे लक्षात घेऊनच, आमच्या मुंबई शहरात सर्वांसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यासाठी कार्य करण्यासाठी मी तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे.

मी माझा वैयक्तिक मोबाइल क्रमांक ९८६९७०२७४७ शेअर करत आहे. तुम्ही नेहमी माझ्याशी WhatsApp/टेक्स्ट मेसेज तसेच फेसबुक https://www.facebook.com/profile.php?id=100066410464886 किंवा Twitter @sanjayp_1 वर संपर्क साधू शकता.

मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि मुंबईतील सर्वांसाठी ‘सुरक्षा आणि सुरक्षितता’ या आमच्या ब्रीदवाक्यासाठी काम करण्यास उत्सुक आहे

आपला सी.पी

संजय पांडे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Budget 2022-23 : शिक्षण समितीचा ३ हजार ३७० कोटीचा अर्थसंकल्प सादर, विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणावर भर

Aprna

वर्षभरात कोकणाला तिसरा फटका, आतातरी सरकारने मदत द्यावी

News Desk

कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्यांना निर्देश द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

News Desk