HW News Marathi
महाराष्ट्र

 ‘अनाथांची माय’ काळाच्या पडद्याआड! सिंधुताई सपकाळ यांचं निधन, सर्व स्तरांतून मोठी हळहळ

पुणे । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं आज (४ जानेवारी) पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात दु:खद निधन झालं आहे. त्या ७४ वर्षांच्या होत्या. ‘अनाथांची माय’ अशी देशातच नव्हे तर जगभरात ओळख असलेल्या सिंधुताई या असंख्य लोकांचा आधार आणि प्रेरणास्थान होत्या. अवघ्या महिन्याभरापूर्वी सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तर, आज सिंधुताईंनी अखेरचा श्वास घेतला.दरम्यान, सिंधुताईंच्या निधनानंतर सर्व स्तरांतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं. अत्यंत मायाळू पण तितकंच कणखर असं सिंधुताईंचं व्यक्तिमत्त्व आणि असामान्य काम सगळ्या जगाला भावलं, प्रेरणास्थान ठरलं.

सिंधुताई सपकाळ यांचा अल्प परिचय

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. सिंधुताई सपकाळ यांचा आई- वडीलांनी त्यांचे नाव चिंधी ठेवले. सिंधुताईंचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. सिंधुताई यांनी १९९४ साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे सिंधुताई यांनी अनाथ मुलांसाठी त्यांनी काम केले. 

अशोक चव्हाण यांचा शोकसंदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर आजवर केलेली मेहनत फटाक्यांमुळे वाया घालवू नका, मुख्यमंत्र्यांचे दिवाळीनिमित्त आवाहन

News Desk

बार्टी तर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास – धनंजय मुंडे

News Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारंच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!

News Desk