HW News Marathi
Covid-19

सगळ्यांसाठी समान नियम ठेवा, परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

पुणे | देशात कोरोना लसीच्या उत्पादनावर सरकार मोठ्या प्रमाणात भर दिली जात आहे. अशात सगळ्यांसाठी समानव नियम असावे अशी मागणी सीरमने केंद्र सरकारकडे केली आहे. फायझर आणि मॉडर्ना या परदेशी कंपन्यांना सरकारने नुकसान भरपाई आणि स्थानिक चाचण्यांमधून सूट दिल्यानंतर आता भारतात लसींची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटनेही गुणवत्तेबाबत केलेल्या कारवाईसाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे म्हणजे कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळवण्याची मागणी केली आहे.

काल (२ जून) भारताच्या औषध नियामक मंडळाने फायझर आणि मॉडर्ना या परदेशी लसींसाठी स्वतंत्र चाचण्या घेण्याची अट दूर केली होती. ज्या लसी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केल्या आहेत त्या लसींची भारतात चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही असे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूटनेही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळवण्याची मागणी केली आहे. सर्वांसाठी एकच नियम लावण्यात यावा अशी मागणी सिरमने केली आहे.

यापूर्वी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना एका तक्रारकर्त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये कंपनीला ५ कोटींची कायदेशीर नोटीस दिली होती. कोव्हिशिल्ड लसींच्या चाचण्यांनतर गंभीर दुष्परिणाम झाल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. त्यानंतर लसीकरण मोहिम सुरळीत करण्याची मागणी पूनावाला यांनी केली होती.

काय होती तक्रार?

लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार या व्यक्तीने केली होती. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत तक्रारीत अदर पूनावाला यांच्याव्यतिरिक्त डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मोहीम संचालक अपर्णा उपाध्याय तसंच इतरांची नावं आहे.

दरम्यान, काल ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ब्रिजिंग चाचण्या करण्याची अट काढून टाकली आहे. आता जर परदेशी लस इतर कोणत्याही देशात किंवा कोणत्याही आरोग्य संस्थेने मंजूर केली असेल तर त्याची गुणवत्ता आणि स्थिरता भारतात तपासण्याची गरज भासणार नाही. हे करण्यासाठी, लसीकरणावरील नॅशनल एक्सपर्ट ग्रुपने शिफारस केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राथमिक शाळांना हिरवा कंदील ; ICMR ने दिली महत्वचाही माहिती

News Desk

पहिल्यांदा एका दिवसात तीन हजार ‘कोरोना’ रुग्ण, राज्याने ओलांडला ५० हजाराचा टप्पा

News Desk

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची ‘प्रिपेड’ समाजसेवा जोरात ! शेलारांचा निशाणा

News Desk