HW News Marathi
Covid-19

सिरम इन्स्टिट्यूटच्या मानवी चाचणी दरम्यान मेंदुरवर परिणाम झाल्याचा स्वयंसेवकाचा आरोप

पुणे | कोरोनावर लस तयार करण्याचे काम संपुर्ण जगभरात सूरू आहे. अशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही लस बनवत आहे. यावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या मानवी चाचणीदरम्यान डोस घेतलेल्या स्वयंसेवकाने ही लस प्रभावी नसून लसीमुळे मेंदू विषयक गुंतागुंत व इतर मानसिक परिणाम झाल्याचा आरोप करत या लसीचीस्वयंसेवकाने चाचणी व उत्पादन व वितरण थांबवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच लस घेतल्याने झालेल्या त्रासाबद्दल ५ कोटींची भरपाई द्यावी अशी नोटीस सिरमला पाठवली आहे. तर, हे सर्व आरोप सिरमने फेटाळले असून लसीची बदनामी केल्याप्रकरणी १०० कोटींचा दावा संबंधित व्यक्तीवर केला आहे.

ऑक्सफर्डने विकसित केलेली व सिरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशील्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशभरात सुरू आहे. चेन्नई येथे एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने ही लस १ ऑक्टोबरला टोचून घेतली आहे. यानंतर या स्वयंसेवकाने त्याला व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचा आणि मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या आजाराची लागण झाली असल्याचा दावा केला आहे. मानसोपचार तज्ज्ञाने केलेल्या तपासन्यांमध्ये हे सिद्ध झाले असून लसीकरणामुळे झाल्याचे त्याने म्हटले आहे. याप्रकरणी सीरम इन्स्टिट्युटला तसेच त्याला लस देणाऱ्या हॉस्पिटललाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने हे आरोप फेटाळून लावत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, या स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. परंतु कोरोना लसीची चाचणी व स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थिती यांचा काहीही संबंध नाही. स्वयंसेवकाने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या स्वयंसेवकाकडून मुद्दामहून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे सीरमकडून त्याच्यावर १०० कोटींचा अब्रूनुकसान भरपाईचा दावा टाकला आहे. याबाबत त्या स्वयंसेवकाला झालेला त्रास लसीकरणामुळे झाला आहे का याची चाचणी औषध महानियंत्रक कार्यालय यांच्याकडून करण्यात येत आहे. शनिवारी सिरमला पंतप्रधान मोदींनी भेट देऊन लस निर्मिती प्रक्रिया पाहणी केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी असा आरोप झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना २४ तासांत ३ वेळा फोन, राज्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती चिंताजनक!

News Desk

खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

News Desk

जाणून घ्या… महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू तर काय बंद?

News Desk