HW News Marathi
महाराष्ट्र

एकटा संभाजी काय करेल, वडील शाहू महाराज पुत्राच्या मागे ठाम उभे!

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आले आहेत. आज (१६ जून) मराठा मूक मोर्चा सुरु झाला आहे. शाहु महाराज यांच्या समाधीस्थळी संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरु झा आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दिला. यावेळी खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. सर्व ४८ खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज म्हणाले. ते कोल्हापुरातील पहिल्या मराठा मोर्चात बोलत होते.

पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी

शाहू महाराज म्हणाले की, “मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्टमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे”.

बलाढ्य आहोत हे दिल्लीला दाखवा

समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील. पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. तत्कालिन पारिस्थितीवरून शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. आपण कमजोर आहोत असं समजू नका. आपण बलाढ्य आहोत हे दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे. खचून जाऊ नका,पण कायद्याचं उल्लंघनही करू नका. तरंच आपल्या जे साध्य करायचं आहे ते साध्य होईल, असंही शाहू महाराज म्हणाले.

हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलताना म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं.”

‘मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी’ अस परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मत मांडलं. तसंच, ‘पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात छत्रपती शाहू यांनी आपली भूमिका मांडत मराठा समाजाला लवकरात लवकर आंदोलन मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

‘एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे हे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे. केंद्रात बहुमतात सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय मांडावा लागणार आहे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो’ असंही छत्रपती शाहू म्हणाले आहेत.

तर नाशिकमध्ये विजयोत्सव करु : संभाजीराजे

राज्य सरकारने चर्चेत आमंत्रण दिलं असलं तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे. राज्य सरकारबरोबर चर्चेचा निर्णय उद्या घेऊ. सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून करू, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

ती आमची चूक होती : हसन मुश्रीफ

सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण नाकारलं, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरी मशिदचा निर्णय देशहिताचा नाही – प्रकाश आंबेडकर

News Desk

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

Aprna

“गद्दार त्यांचं काय चाटत आहेत माहिती नाही”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

Aprna