HW News Marathi
महाराष्ट्र

Shame on ‘The Quint’! अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहिता पेक्षा मोठे कधीच असू शकत नाही.

जेव्हा संपूर्ण राष्ट्र भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याना वाचविण्यासाठी लढत आहे. तेव्हा काही प्रसारमाध्यमाना आपलं रेटिंग आणि हिट्स महत्वाच्या वाटत आहे.

एकीकडे संपूर्ण भारत देश भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत असताना आपल्याच देशातील क्विंट सारख्या न्यूज वेबपोर्टलने आपल्या सुमार पत्रकारितेचे दर्शन घडवले. याच वेबसाईटने प्रकाशित केलेल्या एका वृत्तामुळे कुलभूषण जाधव हा गुप्तहेर आहे, असे पाकिस्तान छाती बडवून सांगू लागला आहे. यामुळे जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. खरे तर क्विंटला याविषयी लाज वाटायला हवी.

‘क्विंट’ वेबसाइटने शुक्रवारी रात्री एक वृत्त प्रकाशित केली. रॉच्या माजी अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार कुलभूषण यांना गुप्तहेर सांगण्यात आले. हे वृत्त प्रकाशित होताच लोकांनी या वेबसाईटवर टीकेची झोड उठवली. फेसबुक, ट्विटर वर #BlockQuint हैश टैग वरून लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर या वेबसाईटवर कायमाचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शिवाय जाधव यांच्या अडचणी वाढवणाऱ्या या पोर्टलवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली. चौफेर टीकेनंतर क्विंटला आपली चूक उमगली व हे वृत्त काढून टाकले.

हे वृत्त देताना क्विंटने रॉच्या तीन अधिकाऱ्याचा हवाला दिला होता. परंतु दुदैवाची बाब म्हणजे या तीन अधिकार्याचे नाव टाकले नाही. क्विंटनुसार हे तिन्ही अधिकारी रॉ चे माजी अधिकारी आहेत. त्यांनी २५ वर्ष या विभागात काम केलेले आहे. एक अधिकारी तर विदेश गुप्तचर विभागात सचिव पदावर काम केलेला अधिकार आहे. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ते जाधव याना आपल्या विभागात सामील करण्यासाठी इच्छुक नव्हते. परंतु जाधव यांना गुप्त माहिती काढण्यासोबत इतर कामासाठी घेण्यात आले होते.

क्विंट इथेच थांबले नाही तर कुलभूषण जाधव हे रॉ चा घटक असल्याचे पुरावे देखील सदर केले. तसेच जाधव याना रॉ मध्ये घेताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे म्हटले आहे.

‘द क्विंट’ ने ओसामा बिन लादेन ला सुद्धा तो किती चांगला वडील होता अशी बातमी प्रसिद्ध करून आदर्शव्यक्ती बनवण्या चा प्रयन्त केले होता व आता जाधव यांना गुप्तचर सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारी बातमी.

‘द क्विंट’ भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तसेच पत्रकारितेला समाजाचा चौथा स्तंभ म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पण काही मर्यादा असता हे विसरता काम नये.अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही राष्ट्रहिता पेक्षा मोठे कधीच असू शकत नाही. असाही एक प्रश्न पडतो धोकादायक कोण आहे ISI का ‘द क्विंट’ सारखे मीडिया?

‘द क्विंट’ ने हि बातमी छापून पाकिस्तानला आयत कोलीतच हातात दिले.जरी ‘द क्विंट’ ने ही बातमी काढून घेतली आहे तरी अनेक पाकिस्तानी मीडिया जसे defence.pk ही वृत्त जसे च्या तसे प्रसिद्ध केले आहे ही बातमी जशी च्या तशी छापून आणली. ‘द क्विंट’ च्या ह्या असंवेदनशील बातमी ने पासपोर्ट च्या आधारे कुलभूषण यांना गुप्तचर म्हणून सिद्ध करण्याचा असफल प्रयत्न केला.

 

कुलभूषण कसे पकडले गेले

कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी अवैधरित्या घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला. पाकिस्तानने दावा केले आहे कि जाधव हे गुप्तहेर आहेत. तर भारतने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जाधव हे नौ दलातील निवृत्त अधिकारी आहेत. ते इराण येथे रीतसर आपला व्यवसाय करण्यासाठी गेले होते. जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानने जाधव यांचा एक वीडियो जारी केला असून त्याद्वारे कबुली दिल्याचा दावा केला आहे. 358 सेंकदाच्या या वीडियोमध्ये 102 कट होते. पाकिस्तान बळजबरीने जाधव यांच्याकडून खोटे वदवून घेत असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा पण दिसत आहेत.

एकूणच क्विंट सारख्या वेब पोर्टलने प्रसिधीसाठी हलकी पत्रकारिता केल्याचे दिसतंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘या’ कारणामुळे नाराज?

News Desk

शरद पवारांनी बोलावली बैठक, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निर्णय

News Desk

आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार 

swarit