HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले शिवबंधन

शिर्डी | जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत आज (११ ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ती भरुन निघणार आहे. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या सेनेत प्रवेश केल्याने नवे वळण येणार आहे.

कोण आहेत शंकरराव गडाख?

शंकरराव गडाख हे अहमदनगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र. नेवासा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. याआधी 2009 मध्येही ते आमदारपदी निवडून आले होते. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. शंकरराव गडाख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुनील डिरवेंच्या हत्येनंतर यवतमाळमध्ये तणाव; ग्रामस्थांचे नागपूर-तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Aprna

आजपासून १२ वीचे ऑनलाईन फॉर्म

News Desk

कोल्हापूर | ‘गोकुळ’च्या राखीव गटात विरोधकांची आघाडी

News Desk