HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राजस्थानच्या घडामोडींनंतर महाराष्ट्र सरकारही अलर्ट, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहेत. राजस्थान येथे काँग्रेसच्या झालेल्या या गोंधळानंतर आता त्याचे महाराष्ट्रातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काल (१३ जुलै) रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही बैठक झाली. दरम्यान, शरद पवारांच्या भेटीपूर्वी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. राजस्थानच्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवादावर भर देत कोणीही नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नसल्याचे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली.

शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले होते, उद्धव ठाकरे उत्तम राज्य सांभाळत आहेत पण सरकार तीन पक्षाचे मिळून असल्याने त्यांनी संवादावर जास्त भर दिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. नुकत्याच मुंबई पोलिसांच्या बदलीप्रकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील असमन्वय समोर आला होता. त्यानंतर शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, या भेटीत यापुढे कोणत्याही प्रशासकीय बदल्या करताना आधी चर्चा मग बदली अशी भूमिका महाविकास आघाडीने स्वीकारली होती.

Related posts

नुकत्याच ‘कोरोना’मुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

News Desk

गुढीपाडव्याच्या आधी राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

बिना ड्रायव्हरची मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या भेटीला…

News Desk