मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ.बलसरा यांनी आज (१२ एप्रिल) एक यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आज त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवारसाहेबांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Update
A successful Laparoscopy surgery was conducted today on our party President Sharad Pawar Saheb's Gall Bladder by Dr. Balsara.
He is in stable health and is recuperating in his room at the Breach Candy Hospital, Mumbai— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 12, 2021
या आधी शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. दरम्यान, ३ एप्रिलला शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते..
शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?
शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात २९ मार्चला दाखल केले होते. या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली होती. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले होते. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.