HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात झाला आहे. नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला होणारा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

शरद पवार २०-२१ नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार होते. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार होते. शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. विशेष म्हणजे खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून हा पहिलाच दौरा आयोजित केला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीसह खडसे समर्थकांकडून जोरदार शक्तप्रदर्शन केले जाण्याची शक्यता होती. शरद पवारांच्या या दौऱ्यासाठी खास नियोजनही करण्यात आले होते. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही सर्व आत्महत्या करू !, पूजाच्या कुटुंबीयांचा इशारा 

News Desk

छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर OBC आरक्षणासाठी घेणार महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी!

News Desk

जलसिंचन विभागाकडून पूररेषांची नव्याने आखणी होणार – जयंत पाटील

News Desk