HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरुप गंभीर, यावर विचार करावा लागेल – शरद पवार

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यावरुन राष्ट्रवादीत गोंधळ उडाला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर या प्रकरणावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, “माझ्यासमोर धनंजय मुंडेंनी सर्व प्रकार आणि माहिती मांडली आहे. त्यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. पक्षप्रमुख म्हणून यावर तातडीने निर्णय घेऊ. तसेच, पक्षातील इतरांशीही बोलू”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, अद्याप त्यांचा राजीनामा आला नाही. माझ्याकडे तसा कोणताही विषय आला नाही आहे. त्यामुळे पक्ष मिळून चर्चा करु”, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, धनंजय मुंडे चित्रकुटवरुन निघाले आहेत आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. आता राष्ट्रवादीत काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे- बंगळूर महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला

News Desk

आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या! – बच्चू कडू

Aprna

‘पुर्वी राजा विरोधात चोर, दरोडेखोर एकत्र यायचे याचा अर्थ राजा चांगले काम करतो’, कपिल पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल!

News Desk