HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

“लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य  

सोलापूर | केंद्र सरकारने तयार केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी रॅलीतील काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार आज (१३ फेब्रुवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

“प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले, असा दावा करत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे. पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एवढीच त्यांची मागणी आहे. केंद्र सरकार केवळ आश्वासन देतेय मात्र प्रत्यक्ष काहीच करत नाही, असा आरोप पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

एके काळी मी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री नव्हतो. मी सोलापुरचा पालकमंत्री होतो. आम्हाला कोण काय म्हणाले तर इथले घोडके सरकार त्या लोकांचे उद्धार करायचे, अशी आठवणही पवार यांनी जागवली. नानासाहेब काळे यांच्या मुळे नान्नज देशात नावारूपाला आलं. आधी नान्नज मध्ये पानमळे झाले त्यानंतर कांदा उत्पादन जास्त झाले. आता नान्नज द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. मी कृषी मंत्री असताना देशातील डाळिंब संशोधन केंद्र सोलापुर जिल्ह्यात स्थापन केले, असंही पवार यांनी सांगितलं. शेतीच्या क्षेत्रात विज्ञान आणणे आवश्यक असल्याचं मतंही त्यांनी व्यक्त केलं. तसंच शेतीचं चित्र बदलण्यासाठी विज्ञान आणावंच लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

दिल्ली हिंसाचारावर बोलताना शरद पवारांनी मोदी सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की, “दिल्ली आंदोलनाच्या वेळी गडबड करणारे खरे शेतकरी नव्हते. त्यामागे शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे घटक होते, सत्ताधारी पक्षातील काही घटक होते. पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने तेथे उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत त्यांना मिळावी एकढीच मागणी शेतकऱ्यांची आहे.”

शरद पवार पुढे म्हणाले की, “गहू आणि तांदळाचे उत्पादन करणारे हे शेतकरी आहेत. आज त्या पिकाची खरेदी करण्यासाठी अन्न महामंडळ ही संस्था आहे. या संस्थेने शेतकऱ्यांच्या उत्पादनाची सर्व जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या काळात आम्ही सर्व खरेदी करत होतो. मधल्या काळात वेगळी मतं मांडली गेली, उत्पादनांची खरेदी व्यवस्थित झाली नाही.”

शरद पवार म्हणाले की, “राज्यात काम करत असताना मी पुण्याचा कधी पालकमंत्री नव्हतो, मात्र सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. शेतीच्या क्षेत्रात क्रांती करणार गाव म्हणून नान्नजची ओळख आहे. माझ्याकडे शेती खात जेव्हा होत तेव्हा कमी पाण्यात येणार पीक म्हणून डाळींबचे संशोधन केंद्र सोलापुरात उभं केलं.” शेतकऱ्यांना सल्ला देताना शरद पवार म्हणाले की, “शेतीच्या क्षेत्रात नावीन्यता कसं येईल, दर्जा कसा सुधारेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं करत असताना जमीन कशी व्यवस्थित राहील ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी.”

लाल किल्ल्यावर नेमकं काय झालं होतं?

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत काही आंदोलक आक्रमक झाल्याचं सगळ्या देशाने पाहिलं. यापैकी काही आंदोलकांनी थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली. या ठिकाणी या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढाई करुन धुडघूस घातला. मात्र पुढच्या काही दिवसांत लाल किल्ल्यावरच्या धुडगूसीपाठीमागे भाजपचा हात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Related posts

अण्णा हजारेंचे उपोषण अखेर मागे

News Desk

औरंगाबाद जिल्ह्यात १, ११७ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची रचना, धोरण लवकरच निश्चित करणार – धनंजय मुंडे

News Desk