HW News Marathi
महाराष्ट्र

‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ एवढं जिव्हारी का लागलं – शरद पवार

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, हे माझं मत इतकं का जिव्हारी लागलं, हे कळत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकाकारांना सुनावलं. इतिहासाच्या संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारे शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक ठरवणं चूकीचं असल्याचं मत आपण मांडल्याचा खुलासा पवारांनी पुण्यात केला.

शरद पवार यांनी हे विधान केल्यानंतर त्याविषयी सोशल मीडियातून चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. छत्रपती शिवाजी महाराज सगळया धर्मांचे होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारलं नाही. शिवाजी महाराज गोब्राम्हणप्रतिपालक नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांना त्यांचा विरोध होता. शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी असते तर, त्यांनी अफजल खानाचा वकिल कृष्णाजी कुलकर्णीला सोडले असते. पण त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीचाही वध केला. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांचा विरोध मोडून काढताना त्यांनी हिंदू, नाती-गोती याची पर्वा केली नाही असं पवार म्हणाले होते.

कर्जमाफीबाबत पवार पूर्ण समाधानी नाही

कोण काय म्हणतो त्याला मी किंमत देत नाही. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांची खदखद त्यातून बाहेर पडत असल्याची टीका पवार यांनी केली. कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात, असं पवार यांनी सांगितलं. शेतमालाच्या हमीभावाबाबत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली. पवार म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन भाजपानं दिलं होतं, त्याचं पालन त्यांनी करावं. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार शेतमालाचे हमीभाव ठरवून द्यावेत अशी शिफारस स्वामीनाथन कमिटीने केलेली आहे. पवारांच्या कर्जमाफी संदर्भात पूर्ण समाधानी नसल्याच्या वक्तव्यानंतर आता राज्य सरकारकडून आणि शेतकरी संघटनांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याविषयी उत्सुकता निर्माण झालीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डीत शेतक-याला पोलिसांनी केली बेदम मारहान

News Desk

‘या’ कारणामुळे आरोह वेलणकर यांना महेश टिळेकरांनी सुनावले!

News Desk

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजा-यांच्या परिक्षेला सुरुवात

swarit