HW News Marathi
महाराष्ट्र

‘नारायण राणेंवर शरद पवारांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया’, म्हणाले…

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण चिघळलं आहे. यावरून राजकारणीही प्रतिक्रिया मांडत आहेत. नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच मत विचारलं असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दात त्यांनी आपलं मत दिलं आहे.

मी त्याला फारसं महत्व देत नाही

शरद पवार यांना नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी थोडक्यात त्यांचं मत दिलं आहे. “मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणेंना अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या याविरोधात अपशब्द काढल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या अटकेसाठी गुन्हा दाखल केला होता. त्याचे पडसाद अख्या महाराष्ट्रात दिसत होते. नारायण राणे यांना शेवटी पोलिसांकडून अटक करण्यात अली आहे. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोर्टाने अर्ज फेटाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची मागणी शिवनेने केली होती. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने ती आता फेटाळला आहे. रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई अटक आहे. मात्र नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस कडक लॉकडाऊनचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

News Desk

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना; नितीन राऊत यांची घोषणा

Aprna

“महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत”

News Desk