HW News Marathi
महाराष्ट्र

राफेलचे ताफ्यात सामील होणे गेमचेंजर ठरणार नाही – शरद पवार

मुंबई | फ्रान्सहून आज (२९ जुलै) भारतात ५ राफेल विमाने दाखल होणार आहेत. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. काल (२९ जुलै) CNN News 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राफेल सामिल झाल्याने गेम चेंज होणार नाही असे वक्तव्य केले आहे. “भारताने हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्याने नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. भारताने ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमाने भारताला मिळाली आहेत. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

चीन सोबतच्या तणावाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही,” असे शरद पवार यावेळी म्हणाले. “जर भारताने सुरक्षेच्या दृष्टीने १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेन. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नाही. भारतानं राफेल हवाई दलात सामावून घेतलं आहे हे चांगलं आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असे वाटत नाही,” असेही त्यांनी या स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, अन्यथा परिणाम गंभीर होतील’

News Desk

“अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

सर्वसामान्य कार्यकर्ता झाला गोकुळचा संचालक, बंटी पाटलांच्या या विश्वासाने बयाजी शेळकेंना अश्रू अनावर

News Desk