HW News Marathi
महाराष्ट्र

जेव्हा शरद पवार स्वत:चीच बातमी पेपरमध्ये वाचतात…

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर शस्त्रक्रिया पार पडली. या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र रुग्णालयातही त्यांना स्वस्थ बसवत नाही, ते वर्तमानपत्र वाचण्याचं काम करतच असतात, असं सांगत शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (१ एप्रिल) सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवार सकाळीच पेपर वाचत असल्याचे दाखवले आहे. कालही सुप्रिया सुळे यांनी एक फोटो शेअर केला होता. पेपरमध्ये छापून आलेला तोच फोटो पवार न्याहाळून पाहत असल्याचं नव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून दिली. या व्हिडीओतही शरद पवार रुग्णालयातील बेडवर बसून पेपर वाचताना दिसत आहेत. लाईव्ह सुरु झाल्यानंतर सुप्रिया सुळे दिसत नाहीत, मात्र त्यांचा आवाज ऐकू येतो. पवार स्वतःचा फोटो पाहत असताना ‘योगायोगाने हाच फोटो लावलाय’ असं सुळे म्हणाल्याचं ऐकू येतं. ‘एकदा गुड मॉर्निंग म्हणता का? सगळे बघतायत तुमच्याकडे’ अशी विचारणाही सुप्रिया सुळे यांनी केली. तेव्हा पवारांनी सर्वांना हलकेसे स्माईल दिले. दरम्यानच्या काळात सुप्रिया सुळेंनी ब्रिच कँडीमध्ये शरद पवारांना दाखल केलेल्या रुमची सैरही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना घडवली.

शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी, त्यापैकी १०६ पुण्यात आढळले !

swarit

ED च्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार! – प्रताप सरनाईक

Aprna

मूर्ती विमानतळासाठी सर्व परवानग्या तीन महिन्यात मिळवा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna