HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी खंबीरपणे उभे – शरद पवार

मुंबई | राज्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (८ एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे असं मत शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधासंदर्भात बोलताना व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रामध्ये ५ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांवरुन दुकानदार, व्यापारी आणि राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला असून या कठीण प्रसंगामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनता सरकारच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी सांगितले.

‘निर्णय राबवण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक’कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व सूचनांचा विचार करून काही निर्णय घेतले जात आहेत. मात्र, हे निर्णय राबवण्यासाठी लोकांचं सहकार्य आवश्यक आहे. सगळ्यांनी कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी आज (८ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाचून दाखवत परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अतिश्य चिंताजनक आहे. कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत.

 

Related posts

मंत्रिमंळातील नव्या तीन मंत्र्यांची पदे धोक्यात

News Desk

अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्याला सक्त मजुरीची शिक्षा

News Desk

अत्यावश्यक सेवांसाठी बेस्ट सेवा कार्यरत राहणार

News Desk