HW News Marathi
महाराष्ट्र

“पूरग्रस्त भागातील दौरे टाळा”, शरद पवारांचं नेत्यांना आवाहन

मुंबई | राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, पुराचा फटका बसल्यानंतर सरकारकडून काय घोषणा करण्यात येणार याकडे पूरग्रस्तांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज (२७ जुलै) पत्रकार परिषद घेत पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

यावेळी पवार यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. “राज्याला पुराचा मोठा फटका बसला. पुरामुळे घरांचं व शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे”, असं पवार यांनी सांगितलं. पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथकं पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. पुराचा फटका बसलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटल्या जाणार असल्याचंही पवार म्हणाले.

माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं

पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”, असं पवार म्हणाले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनाही दौऱ्यावर येऊ नका म्हणून विनंती केली होती

“माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पूनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा. मला आठवतं की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना येऊ नका अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असं त्यांना म्हणालो. तुमच्या इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनीही दौरा रद्द केला”, असं सांगत पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे न करण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • कायमस्वरुपी योजना करण्याची गरज
  • राज्यपालांचा आज दौरा ते केंद्राकडून मदत मिळवून देतील
  • नेत्यांनी पुरग्रस्त भागात दौरे टाळावे
  • राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुरग्रस्तांना मदत केली
  • राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल
  • अहवाल आल्यानंतर मदतीचं धोरण जाहीर करेल
  • कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार
  • जीवनावश्यक बाबी पाठवणार, गॅस, भांडी, सतरंजी पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी पाठवणार
  • २-३ दिवसांत पूरग्रस्त भागात मदत पोहोचेल
  • राज्याला पूराचा मोठा फटकापुरामुळे राज्याचं मोठं नुकसान
  • राज्यात ६ ते७ जिल्ह्यात पूरामुळे बिकट स्थिती
  • राज्य सरकारही मदत करेल
  • घरं, शेतीचं मोठं नुकसान झालं
  • १६ हजार कुटुंबांचं मोठं नुकसान
  • मदत करण्याची आवश्यकता
  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाना, जिल्ह्यांना मदतीची गरज
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत पाठवली
  • स्थानिक स्तरावरही कार्यकर्त्यांनी मदत केली
  • १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादीकडून मदत
  • जीवनावश्यक वस्तूंच वाटप
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही !

News Desk

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

Manasi Devkar

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk