HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही – शरद पवार 

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आणि राजकीय वर्तृळात खळबळ उडाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या सगळ्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे, आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळं आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रेणू शर्मा नावाच्या एका महिलेनं धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती, त्यांनंतर धनंजय मुंडेंनी रेणूच्या बहिणीसोबत आपले सहमतीनं संबंध असल्याचं फेसबुक पोस्टमधून कबूल केलं होतं.

धनंजय मुंडेंनी काल (१३ जानेवारी) शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सर्व माहिती दिल्याचं पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, धनंजय मुंडे मला काल भेटले आणि आरोपाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार काही व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच या तक्रारी तयार झाल्या आहेत. याबाबत हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत कोर्टात सुनावणी होणं बाकी असल्याचं पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधी पक्ष निर्णय घेईल

धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यावर बोलताना पवारांनी सांगितलं की, मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नंतर बघू असं वक्तव्य पवारांनी आज केलं. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय होईल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. या निर्णयात कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब! – अजित पवार

Aprna

तुम्ही माझ्यामागे ED लावलीत, आता माझे काम बाकी ! एकनाथ खडसेंचा इशारा 

News Desk

भाजपला सलग दुसरा धक्का ! हेमेंद्र मेहतांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk